वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील कोंडकारुळ येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लहान बालकांना पोलिओपासून संरक्षण मिळावे आणि प्रत्येक बालकापर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजले. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी विशेष उपस्थिती लावून मोहिमेची पाहणी केली. त्यांनी पालकांना आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देण्याचे आवाहन केले तसेच आरोग्य विभागाच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यानंतर सभापती प्रणव पोळेकर यांनी परिसरातील विविध पल्स पोलिओ लसीकरण केंद्रांना भेटी देत मोहिमेचा आढावा घेतला. प्रत्येक केंद्रावरील लसीकरणाची व्यवस्था, उपस्थित बालकांची संख्या तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची त्यांनी पाहणी केली.
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या. पोलिओमुक्त भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक पालकाने अशा मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कोंडकारुळ येथील या मोहिमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा ग्रामस्थांच्या आरोग्याविषयीच्या जागरूकतेचे द्योतक ठरला.







































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.