केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - सिंहगड (पुणे) येथे नुकत्याच पार पडलेल्या मानाच्या '४२ किलोमीटर माऊंटन मॅरेथॉन' स्पर्धेत लांजा तालुक्यातील श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुकचे क्रीडा मार्गदर्शक. निलेश कुळये, यांनी पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण परिसरातून आणि क्रीडा जगतातून त्यांच्यावर अभिनंदनाच वर्षाव होत असून हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अत्यंत खडतर चढ-उतार, कठीण मार्ग आणि तीव्र आव्हाने असलेल्या या ४२ किलोमीटरच्या माऊंटन मॅरेथॉनमध्ये देशभरातून अनेक नामांकित धावपटू सहभागी झाले होते. या सर्वांवर मात करत कुळये यांनी हे जेतेपद पटकावले.
हे यश त्यांना सहज मिळालेले नाही, तर कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सातत्याने संघर्ष करत त्यांनी आपला सराव चालू ठेवला होता. नित्य नियमाने, कठोर शिस्त आणि अखंड परिश्रमाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत हे सुयश संपादन केले आहे. निलेश कुळये शिक्षक यांच्या यशाचा आणि त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील समृद्ध अनुभवाचा थेट फायदा विद्यालयातील विद्यार्थ्यांना होत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व समजण्यासोबतच मॅरेथॉन आणि इतर मैदानी खेळांची मोठी प्रेरणा मिळत आहे.
स्वतः कुळ्ये यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश मिळवल्याने, "इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते," हा वस्तुपाठ विद्यार्थ्यांना मिळाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी तयारी करत आहेत. कुळये याच्पा दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील क्रीडा प्रवासाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.







































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.