संगमेश्वर (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाच्या विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी या सुमारे चार किलोमीटरच्या महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला. या उपक्रमात तळकांटे ग्रामस्थांनी लोकसहभागातून महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवड करून ती संवर्धित करण्याचा संकल्प केला आहे. ग्रामस्थांच्या या पर्यावरणपूरक पुढाकाराचे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना डॉ. सामंत म्हणाले, "केवळ रस्ते बांधण हाच विकासाचा निकष नाही. विकासासोबत पर्यावरणाचे रक्षण करणे आणि निसर्गाचा समतोल राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
महामार्गाच्या कामामुळे बाधित झालेल्या झाडांची भरपाई म्हणून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येत आहे. शासनाचा हा मार्ग 'हरित महामार्ग' करण्याचा निर्धार असून, लोकसहभागातून हा परिसर अधिक हिरवागार आणि सुंदर बनेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला बंड्याशेठ साळवी, अभिजित हेगशेट्ये, पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, तळकांटे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा बने, प्रांताधिकारी जीवन देसाई, शरद कदम, सरपंच सुषमा बने, उपसरपंच राजू येद्रे, संतोष श्रीकृष्ण बने, राजेश बने, महेश बने, अनिल कळंबटे, तुषार गुरव, सुरेश गुरव आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
यांच्यासह तळकांटे गावातील ग्रामस्थ, निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपण मोहिमेत नवनिर्माण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवकांनी, विविध महिला बचतगटांनी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे महामार्ग परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाचे प्रभावी उदाहरण निर्माण झाले आहे.







































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.