loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेवेला उत्तम प्रतिसाद; रुग्णांची दरमहा हजारो रुपयांची बचत

दापोली (वार्ताहर): दापोली उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या मोफत डायलेसिस सुविधेला तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दररोज सरासरी 7 ते 8 मूत्रपिंडविकारग्रस्त रुग्ण या सुविधेचा लाभ घेत असून, यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापूर्वी डायलेसिससाठी रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत होते. मात्र आता दापोलीत उपजिल्हा रुग्णालय येथे ही सुविधा मोफत उपलब्ध झाल्याने रुग्णांचा खर्च आणि गैरसोय टळली आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक डायलेसिसमागे सुमारे 2 हजार रुपयांची बचत होत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळत आहे.

टाईम्स स्पेशल

उपजिल्हा रुग्णालयातील प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या देखरेखीखाली ही सेवा नियमितपणे सुरू असून, रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत आहेत. त्यामुळे दापोलीसह परिसरातील नागरिकांकडून या सुविधेचे स्वागत होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg