loader
Breaking News
Breaking News
Foto

१२ वीच्या परिक्षेत सलग पंधराव्यावेळी कोकण बोर्ड ९४.१४ % गुण मिळवून महाराष्ट्रात सर्वप्रथम

रत्नागिरी - उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातफै घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या परीक्षेत २०१२ साली स्थापन झालेल्या कोकण बोर्डने ९४.१४% गुण मिळवून राज्यातील नऊ विभागात प्रथम येवून सातत्याने सर्वाधिक निकाल लावण्याची परंपरा कायम राखली आहे. मुलींनी आपली आघाडी नेहमीप्रमाणे कायम राखली आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात झाली. शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या सामूहिक प्रयत्नाचे यश असून तज्ञांचे मार्गदर्शन, योग्य सराव, नियोजन व परस्पर संवाद यामुळे कोकण पॅटर्नने महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर आपले नाव अधोरेखित करून इतिहास निर्माण केला आहे. परंतु कोकणातील विद्यार्थ्यानी स्पर्धा परिक्षेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आपल्या मुलांनी अवकाश तंत्रज्ञानात चांद्रयानाच्या दिशेने प्रवास केला पाहिजे. तसेच नव्या मुंबईत आलेल्या परदेशी विद्यापिठाचे आव्हान आत्मविश्वासाने पेलले पाहिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या तंत्रज्ञानाची भाषा अवगत करून नव्या युगाच्या नव्या वाटा दमदारपणे चोखाळल्या पाहिजेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ए.आय साठी स्पष्ट आणि जबाबदार धोरण तसेच योग्य निधीची आज गरज आहे. कारण तंत्रज्ञानाचा वेग जितका वाढतो आहे, तितकी त्याच्या योग्य वापराची जबाबदारीही वाढते आहे. नव्या कल्पनांना चालना देण्यासाठी, तरुणांना संधी देण्यासाठी आणि सुरक्षित, पारदर्शक ए.आय इकोसिस्टम तयार करण्यासाठी ठोस धोरणे आणि पुरेसा निधी अत्यावश्यक आहे. आज घेतलेले निर्णयच उद्याचा डिजिटल भारत घडवतील यात शंका नाही. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विलास पाटणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg