आरोस - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपशाखाप्रमुख मुबईचे संतोष आमडोसकर मित्र परिवारातर्फे आरोस दांडेली माऊली मतिमंद, कर्णबधिर तसेच रोणापाल येथील दयासागर छात्रालय मध्ये समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. आरोस-दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालय व कर्णबधिर विद्यालयातील सुमारे १०० मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांना अंघोळीकरिता गरम पाण्याचे वॉटर गिझर, तसेच सावित्रीदेवी किशनलाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ अग्रवाल परिवारातर्फे एलइडी टेलिव्हिजन देण्यात आला. यावेळी विद्यालयात शैक्षणिक व जीवनावश्यक साहित्याचेही वाटप यावेळी करण्यात आले.
तसेच रोणापाल येथील दयासागर छात्रालय येथील विद्यार्थ्यांना यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत सदस्या कविता शेगडे, मुबई शिवसेना उपशाखाप्रमुख संतोष आमडोसकर, विनोद हळदणकर, प्रकाश जाधव, रविंद्र सुकाळे, जगदीश म्हात्रे, कृष्णा शेगडे, नाना फाटक आदी उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या शिक्षणास व मनोरंजनालाही चालना मिळणार असल्याचे आमडोसकर यांनी सांगितले. तसेच आपण बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे वीस टक्के राजकारण आणि ऐशी टक्के समाजकारण करून, सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे सांगितले. विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत यावेळी उपस्थिनांनी हितगुज केले.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संतोष आमडोसकर मित्र परिवाराच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत आभार व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी, समाजातील गरजू व विशेष मुलांसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केल. सामाजिक बांधिलकेची जाणीव ठेवून संतोष आमडोसकर मित्र परिवाराने केलेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी असाच आहे. रोणापाल दयासागर छात्रालय चे व्यवस्थापक जिवबा वीर आणि आरोस दांडेली विद्यालयाचे रुपेश सावंत यांनी यावेळी आमडोसकर मित्र परिवाराचे आभार व्यक्त केले.










































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.