खेड (प्रतिनिधी) - गुहागर मधील शिर येथील संशयित आरोपी वैभव सिताराम ठोंबरे व शिवराम हरी आंबेकर यांच्याविरुद्ध पीडित महिलेने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. गुहागर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३७६ नुसार दाखल केला होता. आम्ही सरकार पक्षाने एकूण बारा साक्षीदार तपासले. आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट समीर शरद शेठ व एडवोकेट सुधीर शरद बुटाला यांनी काम पाहिले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार तिचे पती मुंबई येथे असतात. याचा गैरफायदा घेऊन आरोपी नंबर एक याने वेळोवेळी तिच्या घरी येऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपींतर्फे वकील सुधीर बुटाला व समीर शेठ यांनी पंच व साक्षीदाराचा विस्तृत उलटतपास नोेंदविला. उलट तपासादरम्यान सदर साक्षीदाराला अनेक सुचनात्मक प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी सदर साक्षीदाराने मान्य केले की, घटनास्थळ वाडी असून त्याचे नाव भाटलेवाडी आहे. फिर्यादीच्या घराशेजारी दहा ते बारा जुनी कौलारू छप्पर असणारी घरे आहेत आणि जर फिर्यादीच्या घरात जर कोणी ओरडले तर आजूबाजूच्या घरातील लोकांना ऐकू जाते. अशा स्वरूपाची घरे आहेत.
सदर साक्षीदाराने उलटतपासात मान्य केलेल्या महत्वूपर्ण बाबींचा विचार मे. सेशन जज यांनी करता फिर्यादीसोबत लैंगिक अत्याचाराची घटना खरोखरीच घडली होती तर फिर्यादीला मोठयाने ओरडून शेजारी घरातील लोकांना मदतीसाठी बोलावून घेणे शक्य होते. परंतु याकामी तसे घडले किंवा नाही, याबाबत मेहरबान कोर्टाने खात्री केली. फिर्यादीने उलटतपासात पुढे जाऊन हे देखील मान्य केले की, जुलै २०१७ मध्ये तिने आरोपींविरुध्द गुहागर पोलीस ठाण्यात पैशांसंदर्भात तक्रार केली होती. त्यावेळी पोलीसांनी आरोपींना बोलावून चौकशी केली होती. सदर पुराव्यावरून असे दिसून येते की, या केसमधील फिर्याद दाखल करण्यापूर्वी फिर्यादीने आरोपींविरुध्द गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु जुलै २०१७ मध्ये पैशांसंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीच्यावेळी तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत तक्रार देण्यात तिला कोणतीही अडचण नव्हती. त्यामुळे सरकार पक्षाच्या केसप्रमाणे व फिर्यादी कथन करते त्याप्रमाणे आरोेपींनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला ही घटना घडली किंवा कसे याबाबत साशंकता उपस्थित होते.
फिर्यादीने उलटतपासात हेही मान्य केले की, दि.०३.०९.२०१७ रोजी आरोपी क्र.२ यांनी तिच्याविरुध्द शिवीगाळ व धमकी दिल्याबाबतची तक्रार दाखल केली व त्या अनुषंगाने तिला पोलीसांनी चौकशीसाठी बोलावले होते आणि ती केस प्रलंबित आहे. त्यामुळे केवळ आरोपी क्र.२ ने फिर्यादीविरुध्द दाखल केलेल्या केसला शह देण्यासाठी विचारविनिमय करून आरोपींना खोट्या गुन्हयात गोवण्यासाठी सदरची केस केल्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपीतर्फे अँड. समीर शेठ यांनी उलटतपासात फिर्यादीला तिने सोन्याचे दागिने गहाण ठेवून आरोपीला पैसे दिले हि बाब खोडून काढणेकरीता सुचनात्मक प्रश्न विचारला असता फिर्यादीने कोणत्या तारखेला व कोणत्या दिवशी दागिने गहाण ठेवले होते. याबाबत काहीही सांगितलेले नाही अथवा सरकार पक्षाने दागिने गहाण ठेवल्यासंदर्भात कोणताही कागदोपत्री पुरावा अभिलेखावर आणलेला नाही. अशाप्रकारे एकंदर सर्व पुरावा पाहून अॅड. समीर शरद शेठ यांचा युक्तिवाद ऐकून मेहरबान जिल्हा न्यायाधीश चिपळूण यांनी आरोपी ची निर्दोष मुक्तता केली.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.