संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत दापोली तालुक्यातील निगडे येथील सुकन्या साक्षी संतोष पाते हिने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम येत ’एडब्लूपीएल’ संस्थेची बहुप्रतिक्षित काठमांडू (नेपाळ) टूर जिंकली आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे दापोली तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आयुर्वेद प्रसार आणि रोजगाराची अनोखी सांगड ’एडब्लूपीएल’ ही संस्था संपूर्ण भारतभर आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करून भारताला सुदृढ व निरोगी बनवणे, तसेच त्यासोबतच भारतीय तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, अशा दुहेरी संकल्पनेतून ही संस्था कार्य करते.
आयुर्वेदाचा उत्तम प्रचार करणार्या आणि उत्कृष्ट कार्य करणार्या सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेकडून परदेश वा विशेष सहलींचे (टूर) बक्षीस स्वरूपात आयोजन केले जाते. याच उपक्रमांतर्गत अत्यंत मानाची समजली जाणारी ’काठमांडू, नेपाळ’ टूर महाराष्ट्रातून सर्वात आधी जिंकण्याचा मान साक्षी संतोष पाते हिने मिळवला आहे. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीची जपणूक साक्षी ही सध्या एमबीए चे उच्च शिक्षण घेत आहे. आपले व्यावसायिक शिक्षण सांभाळत, सामाजिक जाणीव ठेवून तिने आरोग्य क्षेत्रात आणि आयुर्वेदाच्या प्रसारात स्वतःला झोकून दिले. तिच्या या यशाने हे सिद्ध केले आहे की, इच्छाशक्ती आणि योग्य नियोजनाच्या जोरावर तरुण पिढी कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठू शकते.
मुक्काम निगडे (ता. दापोली) येथील रहिवासी असलेल्या साक्षीच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. ग्रामीण भागातील एका तरुणीने राष्ट्रीय पातळीवर संस्थेचे काम करून महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवणे, ही दापोलीकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे त्रिवार अभिनंदन केले जात असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे. उच्च शिक्षण घेत असतानाच आरोग्यासारख्या महत्वाच्या क्षेत्रात काम करणे आणि एवढं मोठं यश मिळवणे ही अभिमानाची गोष्ट आहे. साक्षीने दापोलीच्या वैभवात मोलाची भर घातली आहे.









































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.