loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी तहसीलदार कार्यालय परिसराचे सुशोभीकरण सुरू; भाई देऊलकर यांच्या निवेदनाची दखल

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुसागर पर्यटन प्रबोधिनीचे संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वासुदेव सहदेव उर्फ भाई देऊलकर यांच्या निवेदनाची दखल घेत, सावंतवाडी तहसीलदार कार्यालय परिसराच्या सुशोभीकरण आणि दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. ​तहसीलदार कार्यालय परिसराची झालेली दुरवस्था पाहून भाई देऊलकर यांनी गेल्या वर्षी १७ सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदार श्रीपाद पाटील यांना एक सविस्तर निवेदन दिले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवेदनात त्यांनी शासकीय इमारतीची रंगरंगोटी करावी, तसेच कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत सुंदर गार्डन (बगीचा) विकसित करावे, अशी मागणी केली होती. ​तहसीलदार श्रीपाद पाटील यांनी या मागणीचा सकारात्मक पाठपुरावा करून कामाला मंजुरी मिळवून दिली. सद्यस्थितीत तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीचे रंगरंगोटीचे काम वेगाने सुरू आहे. तसेच, कार्यालयासमोरील जागेत लवकरच संरक्षण भिंत बांधून त्याठिकाणी सुसज्ज गार्डन निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही तहसीलदार श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

टाईम्स स्पेशल

आपल्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने काम सुरू केल्याबद्दल भाई देऊलकर यांनी तहसीलदार श्रीपाद पाटील यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व आभार मानले. याप्रसंगी 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'चे सदस्य रवी जाधव यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg