केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बारसू येथे अदानी पॉवरच्या माध्यमातून प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाचा सामंजस्य करार करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर हा कोकणाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रकार आहे. आजपर्यंत कोकणावर जेव्हा जेव्हा विनाशकारी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तेव्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष स्थानिक कोकणी जनतेसोबत खंबीरपणे उभा राहिला आणि जनशक्तीच्या बळावर अशी संकटे परतवून लावली आहेत.
बारसू पंचक्रोशीवर आलेले हे नविन संकटही स्थानिक ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी आणि समस्त शिवसैनिकांच्या सहकार्याने परतवून लावल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. असा सज्जड इशारा उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांनी दिला आहे. कोकणाला उद्योगांच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचा कोणाचाही डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.
या संदर्भात लवकरच राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतील आणि स्थानिकांच्या भूमिकेशी पूर्णपणे बांधील राहतील. आमची बांधिलकी फक्त आणि फक्त कोकणी जनतेशी असून जनतेवर अन्यायकारक लादणारे प्रकल्प हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. आम्ही पुर्णपणे जनतेच्या पाठीशी रहाणार असल्याचे रवींद्र डोळस यांनी म्हटले आहे.











































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.