खेड (प्रतिनिधी) - कोकण धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबईच्या वतीने संघटनात्मक कार्य अधिक प्रभावी व बळकट करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये मनोहर कोकरे यांची रत्नागिरी जिल्हा सचिव, सचिन माने यांची चिपळूण तालुका सचिव, आनंद शेळके यांची संगमेश्वर तालुका अध्यक्ष तसेच रंजन कोकरे यांची वहाळ जिल्हा परिषद गट विभाग प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
धनगर समाजाचे संघटन अधिक सक्षम करणे, समाजातील प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत संपर्क वाढविणे, समाजाच्या समस्या व मागण्या शासन व प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे तसेच युवकांना समाजकार्यात सहभागी करून समाजहिताचे विविध उपक्रम राबविणे, या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल आणि समाजहिताचे विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास कोकण धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबईचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य तसेच समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीबद्दल मंडळाचे पदाधिकारी, समाजातील मान्यवर व समाजबांधवांनी मनोहर कोकरे, सचिन माने, आनंद शेळके आणि रंजन कोकरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


















































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.