loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; कसबा उपकेंद्रात ७० बालकांचे लसीकरण

शास्त्री पूल (वहाब दळवी) - आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार, २८ जून २०२६ रोजी कसबा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ५ वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. "दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी" या घोषवाक्याखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या केंद्रावर एकूण ७० लाभार्थी बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. या मोहिमेचा प्रथम लाभार्थी विरा धनाजी भांगे ही ठरली. तिच्या हस्ते मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी डॉ. आशिष थिगळे, सरपंच पूजा लाने, प्रमोद माने (समुदाय आरोग्य अधिकारी), एएनएम रेश्मा घोरपडे तसेच आशा सेविका दिपाली साळवी यांनी उपस्थित राहून लसीकरण मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी केली. त्यांनी पालकांना पोलिओमुक्त भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येक वेळी प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजण्याचे महत्त्वही पटवून दिले. आरोग्य विभागाच्या या उपक्रमाला ग्रामस्थ आणि पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमांमध्ये प्रत्येक पालकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg