loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरेवायंगणी येथील आयोजित व्यवसाय मार्गदर्शन शिबीराला विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त प्रतिसाद

दापोली (प्रतिनिधी) : तेरेवायंगणी येथे विद्यार्थ्यांसाठी खास व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या व्यवसाय मार्गदर्शन शिबीराला विद्यार्थ्यांची मोठीच उपस्थिती लाभल्याने आयोजित केलेल्या व्यवसाय शिबिरीचा कार्यक्रम चांगलाच सफल झाला. दापोली तालुक्यातील तेरेवायंगणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयएपीए संस्था मुंबईच्यावतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या व्यवसाय मार्गदर्शन शिबीराचा दापोली तालुक्यातील शिवनेरी शिक्षण संस्था संचालित कै. कमलाकर जनार्दन जावकर तथा भाई जावकर विद्यामंदिर तेरेवायंगणी, आगरवायंगणी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित बहुजन हिताय विद्या मंदिर आगरवायंगणी, विदया मंदिर हायस्कूल उन्हवरे, ए.जी. हायस्कूल भाग शाळा उंबर्ले ता.दापोली येथील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या ७० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. मुंबई येथील बायकर ग्रुपच्या मान्यवर सदस्यांनी तसेच सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ मृदुला पेंडसे यांनी विद्यार्थ्यांना व्यवसायाचे विविध मार्ग सांगितले आणि आपले अनुभवही कथन केले. या कार्यक्रमासाठी आयएपीए संस्थेच्या ट्रस्टी श्री. व सौ. मांडवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

टाईम्स स्पेशल

ए.जी. हायस्कूल भाग शाळा उंबर्लेच्या मिरा केदार साठे, चेतन राणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेरेवांयगणीचे उपशिक्षक कुटरेकर, आगरवायंगणी हायस्कुलचे मुख्याध्यापक सत्यवान दळवी, वैद्य, तेरेवायंगणी हायस्कुलचे मुख्याध्यापक हेमंत शिगवण, पांदे, सदावर्ते, तांबे आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयएपीए ग्रामीण समन्वयिका अश्विनी वैद्य यांनी अथक प्रयत्न केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg