loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली-आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलेला रुग्णवाहिका नाकारली पण वैष्णवी भागवत यांनी माता आणि बाळाचे प्राण वाचविले, चौकशी होणार का?

दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यातील आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलेला १०८ रुग्णवाहिका डिझेल नसल्याचे कारण देत उपलब्ध करून देण्यास नकार दिल्याच्या गंभीर प्रकरणात सुरुवातीला कठोर कारवाईचे संकेत देणार्‍या आरोग्य विभागाने अखेर संबंधित चालक आणि लिपिकाचा खुलासा ग्राह्य धरून केवळ समज देत प्रकरण निकाली काढल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. देहणे येथील गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याची आवश्यकता असताना डिझेल नसल्याचे कारण देत १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नव्हती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या वैश्णवी भागवत यांनी पुढाकार घेत पर्यायी व्यवस्था करून माता व बाळाचे प्राण वाचविले. या प्रकरणाची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये चौकशी करणार आहेत का?

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेनंतर नागरिकांत संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने संबंधित चालक व लिपिकाला कारणे दाखवा नोटीस बजावत चौकशी सुरू केल्याचे जाहीर केले होते. बदली, वेतनवाढ रोखणे किंवा सेवा समाप्तीसारख्या कठोर कारवाईची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र चौकशीनंतर दोघांचा खुलासा मान्य करून त्यांना केवळ समज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे यांनी संबंधितांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक असल्याचे सांगितले.

टाईम्स स्पेशल

मात्र सुरुवातीला नोटीस बजावण्याची गरज का भासली आणि स्पष्टीकरण योग्यच होते, तर इतकी कठोर भूमिका का घेण्यात आली, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या निर्णयामुळे आरोग्य विभागाने खरोखर जबाबदारी निश्चित केली की केवळ औपचारिकता पूर्ण केली, याबाबत चर्चा रंगली असून दोषींना अभय देण्यात आल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा बोध घेऊन आपत्कालीन परिस्तिथीत कोणती उपाययोजना करावी याची एसओपी आरोग्य विभागाने तयार करावी अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg