loader
Breaking News
Breaking News
Foto

आरटीई प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा भाजपाचा आरोप; भाजपची चौकशीची मागणी

खेड (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) कायदा २००९ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा दिली जाते. मात्र, खेड तालुक्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेत नियमांची पायमल्ली झाल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे तसेच प्रांताधिकारी वैशाली पाटील यांना निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. भाजपाच्या निवेदनानुसार, खेड येथील शिक्षणाधिकारी बाईत आणि त्यांचे सहकारी जोशी यांनी शासनाच्या निकषात न बसणाऱ्या विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत निवड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बनावट भाडेकरार (रेंट अ‍ॅग्रीमेंट) तयार करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे वास्तव्य शाळेपासून तीन किलोमीटर अंतरावर असतानाही नियम धाब्यावर बसवून प्रवेश देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, आरटीईसाठी निश्चित करण्यात आलेल्या उत्पन्नाच्या निकषापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांची निवड करण्यात आल्याचे भाजपाने म्हटले आहे. यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले पालक, पांढरे रेशन कार्डधारक तसेच आयकर भरणाऱ्या पालकांचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

त्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्यांक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहिम सहिबोल, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, स्वराज गांधी आणि विघ्नेश शिंदे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg