loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षक, शिक्षकेत्तरांना आयुष्मान कार्ड सक्तीचे, १०० टक्के नोंदणीचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश

खेड (प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आयुष्मान कार्ड काढण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. 'आयुष्मान भारत' आणि 'महात्मा फुले जनआरोग्य योजना' यातून ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय मोफत मिळविण्यासाठी आयुष्मान कार्ड सक्तीचे केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षण संचालकांनी परिपत्रकात म्हटले आहे की, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्ड नोंदणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. आयुष्मानचे पोर्टल, सीएससी सेंटर किंवा आरोग्य केंद्रात जाऊन हे कार्ड काढता येते. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारापोटी शासनाकडून परतावा मिळतो. संपूर्ण कुटुंबाला वैद्यकीय उपचार शासकीय खर्चातून मिळतात. पण आता त्यांना प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय विमा कवचही देण्यात येणार आहे. मात्र, त्याचा लाभ मिळवायचा असेल, तर आयुष्मान कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. कॅशलेस उपचार मिळविण्यासाठी आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट' तथा आभा' कार्ड काढावे लागणार आहे.

टाईम्स स्पेशल

१४ अंकी 'आभा' नोंदणी क्रमांक अवघ्या काही मिनिटांत ऑनलाइन स्वरूपात करता येतो. केंद्र सरकारच्या डिजिटल हेल्थ मिशनच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करता येते. आधार कार्ड किंवा चालक परवान्याद्वारे ओटीपी मिळवून काही मिनिटांत कार्ड काढता येते. सरकारी रुग्णालयांमध्येही ऑफलाइन नोंदणीची सुविधा आहे. तेथे आधार कार्डच्या मदतीने आभा कार्ड तयार करून दिले जाते. जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 'आभा' नोंदणी तातडीने पूर्ण करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg