loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा येथील अपघातग्रस्त गॅस टँकर मधून रिफील कामामुळे रात्री वाहतूक काही तास बंद राहणार

रत्नागिरी : (राजन बोडेकर)जयगड ते कोल्हापूरच्या दिशेने जाणारा गॅस टँकर आंबा नजीक मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पलटी झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला. अपघातानंतर कोल्हापूर रत्नागिरी वाहतूक सुरू असून आज बुधवार रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान गॅस टँकर मधून गॅस रिफील केला जाणार आहे. त्यामुळे आंबा घाट मार्गे कोल्हापूर येथे जाणाऱ्या वाहनांनी त्यापूर्वी प्रवास करणे गरजेचे आहे अन्यथा रात्र 10 नंतर गॅस रिफील करण्यात येणार असल्याने काही तास वाहतूक ठप्प राहणार आहे, अशी माहिती महामार्ग वाहतूक शाखा कोल्हापूरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा एमगेकर यांनी रत्नागिरी टाइम्स डिजिटल कडे बोलताना दिली. तसेच त्यांनी आवाहन केले आहे की कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी रात्री गगनबावडा किंवा पाटण मार्गे प्रवास करावा ,असे आवाहन केले आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg