रत्नागिरी - महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात ७२ व्या राष्ट्रीय फिटनेस आणि शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६ चा दिमाखदार शुभारंभ झाला. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या स्पर्धेचे भव्य उद्घाटन करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरवर्षी या स्पर्धेचे अधिक दिमाखदार पद्धतीने आयोजन करू असे ना. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो नामांकित शरीरसौष्ठवपटू रत्नागिरीत दाखल झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी खेळाडूंच्या पिळदार शरीरयष्टीने आणि आकर्षक 'पोझेस'नी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात खेळाडूंना उत्स्फूर्त दाद दिली, ज्यामुळे संपूर्ण रत्नागिरी शहर क्रीडामय झाले आहे.
या सोहळ्याला राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू (तीन वेळा भारतश्री) सुहास खामकर, उपनगराध्यक्ष, रत्नागिरी न.प. समीर तिवरेकर, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना सदानंद जोशी, कार्याध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना विरेंद्र वणजू, राष्ट्रीय संघटनेचे पदाधिकारी बी. कृष्णराव, विजय काटदरे, केतकर, बाबू म्हाप, बिपिन बंदरकर, सुदेश मयेकर, नित्यानंद भुते. तसेच जितेंद्र नाचणकर, नगरसेवक राजन शेटे, अमित विलणकर, इम्तियाज काझी, संतोष कदम, संदेश चव्हाण, शैलेश नार्वेकर, फैयाज खतीब, शैलेश जाधव आणि नरेंद्र वणजू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी भारतभरातील विविध राज्यांतून अव्वल शरीरसौष्ठवपटू रत्नागिरीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमुळे रत्नागिरीच्या पर्यटनालाही चालना मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.





































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)




















































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.