नाणीज : तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती नाणीज येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता अध्यक्ष एम. बी. कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर उपाध्यक्ष नितीन कांबळे, सल्लागार संजय कांबळे, नाणीज विकास सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. पूजा-पाठानंतर आयोजित जाहीर सभेत उपाध्यक्ष नितीन कांबळे यांनी प्रास्ताविक करताना गेल्या तीन वर्षांतील मंडळाच्या कार्याचा व विकासकामांचा आढावा मांडला. यावेळी ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल सौ. सानिया (जागृती) प्रशांत कांबळे यांनी भगवान बुद्धांनी दिलेल्या ‘दहा पारमिता’ विषयी उदाहरणांसह सविस्तर मार्गदर्शन केले व त्या आचरणात आणण्याचे आवाहन केले.
मुंबई मंडळाचे उपचिटणीस तेजस कांबळे यांनी कामगार दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना मिळवून दिलेल्या हक्कांबाबत माहिती दिली. तसेच डी.जे. सामंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे यांनी विद्यार्थ्यांसाठी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्ष एम. बी. कांबळे यांनी आपल्या मनोगतात मंडळाच्या सामाजिक, धार्मिक व विकासात्मक कार्याचा उल्लेख करत बुद्ध विहार दुरुस्तीसाठी सर्वांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले. सायंकाळी ६ वाजता भव्य धम्म रॅली काढण्यात आली. रात्री १० वाजता वाडीतील लहान मुलांचे व धम्मगीतांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष नितीन कांबळे, सहसचिव सतीश कांबळे, कोषाध्यक्ष सुशांत कांबळे, सभासद चंदू कांबळे, महिला मंडळ अध्यक्षा प्रतिभा कांबळे, उपाध्यक्ष मीना कांबळे, सदस्या मीनाक्षी कांबळे, मुंबई मंडळाचे उपसचिव तेजस कांबळे, कोषाध्यक्ष दिनेश कांबळे आदींनी मोलाचे सहकार्य केले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलांना दिनेश कांबळे यांनी त्यांच्या बंधू स्व. संदीप कांबळे यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.







































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)




















































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.