loader
Breaking News
Breaking News
Foto

कौंढर काळसुर गावची ग्रामदेवता श्री वाघजाई देवी मंदिर जिर्णोध्दार व प्राणप्रतिष्ठा सोहळा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील कौंढर काळसुर गावची ग्रामदेवता श्री वाघजाई देवी मंदिर जिर्णोध्दार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रविवार दि. १० मे ते बुधवार दि. १३ मे २०२६ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १० मे रोजी दुपारी २ वा. तांबेवाडी येथून "मुर्तीची भव्य मिरवणूक"काढण्यात येणार आहे. सोमवार दि. ११ मे रोजी सकाळी ८ ते ९ वा. शोभा यात्रा सहाण ते मंदिर, सकाळी ९ ते दु. १ वा. धार्मिक विधी, दुपारी २ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ वा. किर्तन ह.भ.प. चिंतामणी निमकर (पुणे), रात्रौ ९.१५ वा. हनुमान भजन मंडळ (मधलीवाडी), रात्रौ ९.३० वा. महाप्रसाद मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते दु. १ वा. धार्मिक विधी, दुपारी १२.३६ वा. कलशारोहण ह.भ.प. कृष्णकांत महाराज (पाटण), दुपारी २ वा. महाप्रसाद, सायं. ४ ते ६ वा. सत्कार,सायं. ७ ते रात्रौ ९ वा. किर्तन ह.भ.प. आचार्य लक्ष्मण महाराज बोधेगांवकर (अध्यापक : गाथा मंदिर देहू पुणे) रात्रौ ९.३० वा. महाप्रसाद,रात्रौ १०.३० वा. भजन डबलबारी गौरव पांचाळ (फुणगुस संगमेश्वर) व चंद्रकांत बुवा जाधव (भांडूप)

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बुधवार, दि. १३ मे रोजी सकाळी ८ ते दु. १ वा. धार्मिक विधी, दुपारी १२ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी २ वा. महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ वा. महिला मंडळ हळदी कुंकू कार्यक्रम, सायं. ५ ते ७ वा. मान्यवरांचा सत्कार, सायं. ७.३० वा. सुस्वर भजन श्री चिंतामणी संगीत कला मंच, रात्रौ ८.३० वा.(गुरववाडी, बाल कलाकारांचे सुस्वर गीत भजन) श्री सोनगाई हितवर्धक नाट्य मंडळ, तांबेवाडी यांचे सुस्वर भजन, रात्रौ ९ वा. महाप्रसाद, रात्रौ १०.३० वा. कोकणचे खेळे बहुरंगी नमन शिवशंभो नाट्य नमन मंडळ, तालुका संगमेश्वर, तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री ग्रामदेवता मंदिर, कौंढर काळसूर (रजि.) मंदिर कमिटी आणि उत्सव समिती व ग्रामस्थ यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg