loader
Breaking News
Breaking News
Foto

रामराजे कॉलेजची नुपुर नवरत (कला शाखेत) दापोलीत प्रथम

दापोली (प्रतिनिधी) - डिस्टिंक्टीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रामराजे ज्यु. कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स सायन्सच्या इयत्ता १२वी चा निकाल ८७.१५% लागला असून विज्ञान शाखेचा निकाल ९५% लागला, वाणिज्य शाखेचा निकाल ९०.२४% तर कला शाखेचा निकाल ८१.८१% लागला आहे. नुपुर संदीप नवरत हिने ८७.५०% गुण मिळवून महाविद्यालयात त्याचबरोबर कला शाखेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. कला शाखेत नुपुर संदीप नवरत ८७.५०%, वाणिज्य शाखेत पुर्वा महेश गमाने ६९.००% तसेच विज्ञान शाखेत श्रेयस कौस्तुभ रानडे ७०.१७% यांनी महाविद्यालयात शाखानिहाय प्रथम क्रमांक पटकावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक संदीप राजपुरे, अध्यक्षा स्मिताली राजपुरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक हर्डीकर तसेच सर्व संचालकांनी अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या वेदिका राणे, प्रा. संतोष येसावरे, प्रा रेश्मा तांबे, प्रा. स्मिता बैंकर, प्रा. विद्याधर बेंडखळे, प्रा. क्षितिजा गोडबोले, प्रा. विभावरी गमरे, प्रा. निलेश तेरेदेसाई, प्रा. रुपेश तांबे, प्रा. समीर लवाटे, प्रा. प्रीती सकपाळ आणि प्रा. अंकिता दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg