loader
Breaking News
Breaking News
Foto

जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्यावतीने कोतवडे येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

कोतवडे (वार्ता.) - जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने २७ जून या दिवशी रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावातील गावणवाडी येथील २० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते दीपक सांबरे, हरिश्चंद्र धावडे, प्रशांत सनगरे, दत्ताराम पाष्टे, रमेश मांडवकर, सुहास शितप, अनंत पाष्टे, संजय पाष्टे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नीलेश सांबरे यांनी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. गावणवाडी येथील ग्रामस्थ वह्यावाटपाच्या या उपक्रमाविषयी ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निश्चितच यामुळे लाभ होईल’, अशी भावना व्यक्त केली. या वेळी वाडीप्रमुख रवींद्र गोताड यांसह सर्वश्री संदीप गोताड, प्रकाश ठोंबरे, दीपक गोताड ,पांडुरंग नाचणकर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg