loader
Breaking News
Breaking News
Foto

निवळी कोकजेवठारात दरड कोसळणे सुरुच, जीवितहानीचा धोका

रत्नागिरी (किशोर मोरे) - मुंबई-गोवा महामार्गावर निवळी कोकजेवठार खांबडवाडी येथे डोंगराची दरड कोसळणे सुरुच असून जीवितहानीचा धोका स्थानिक ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. महामार्गावरुन वाहन जाताना अचानक दरड कोसळली तर मात्र मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भिती व्यक्त होत आहे. निवळी ते संगमेश्वरपर्यंत अनेक ठिकाणी दरडी पडण्याचा धोका असल्याने वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मात्र अचानक जर दरड कोसळली तर काय? असा प्रश्न प्रवासी वाहनधारकांतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या मार्गावरचा प्रवास सध्या धोक्याच्या छायेखाली असल्याचे सांगितले जातेय. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत वेळीच उपाययोजना करण्याची मागणी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg