कर्जत (जयेश जाधव) - पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जोपासत मुंबई येथील न्यायालयीन कर्मचारी आणि ग्रामस्थ मंडळ, खांडपे यांच्या संयुक्त विद्यमाने "वृक्षारोपण व संवर्धन – २०२६" हा उपक्रम शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी खांडपे येथे उत्साहात पार पडला. न्यायदानाची जबाबदारी पार पाडताना समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
या उपक्रमात न्यायालयीन कर्मचारी, ग्रामस्थ, युवक, महिला, वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. श्री खंडाई माता मंदिर परिसर, प्राथमिक शाळा खांडपे, ज्ञानमकरंद विद्यालय, गावातील रस्त्यांच्या दुतर्फा तसेच स्मशानभूमी परिसरात विविध स्थानिक व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षांची रोपे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि जलसंकट यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी न्यायालयीन कर्मचारी आणि ग्रामस्थ मंडळाच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरीत्या पार पडली. उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, न्यायालयीन सहकारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक तसेच संबंधित विभागातील अधिकारी यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.


















































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.