loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयाचा बारावी वाणिज्य व विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल

खेड - श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज(सी.बी.एस.ई.) वेरळ येथील वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केले. यामध्ये वाणिज्य शाखेमधून सिध्दी कडजवकर (८९.१७ टक्के), आफ्रा सांगले (८५.८३ टक्के), अंजली जंगम (८१.३३ टक्के) तसेच विज्ञान शाखेमधून आर्या कदम (८२ टक्के), सिद्दीकी बुशरा (७१.५० टक्के) जयदीप भोरजे (६९.३३ टक्के) यांनी उत्तम गुण मिळवून प्रशालेमध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकावला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच या विदयार्थांनी सुयश संपादन करुन प्रशालेच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव कोरले असून प्रशालेची अविरत यशाची परंपरा चालू ठेवली आहे. संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे, सेक्रेटरी डॉ. संजना पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg