loader
Breaking News
Breaking News
Foto

घोटगे ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांनी केलेले आमरण उपोषण १ मे महाराष्ट्र दिना दिवशी लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले

साटेली (प्रतिनिधी) - घोटगे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने १ मे महाराष्ट्र दिनी आपल्या पाच मागण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय घोटगे येथे सुरू केलेले उपोषण सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी विनायक जाधव यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण तात्काळ मागे घेण्यात आले. घोटगे गावच्या सरपंचा भक्ती भरत दळवी, उपसरपंच विजय प्रकाश दळवी, ग्रामस्थ विनय भगवान दळवी, सदस्या समीक्षा सतीश दळवी, सदस्य अजय वासुदेव दळवी यांनी ग्रामपंचायत कार्यालय घोटगे येथे उपोषण सुरू केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आमचे उपोषण मागे घेणार नाही असा इशारा दिला होता. तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाचा कालवा घोडगेवाडी घोटगे परमे कुडासे सासोली मार्गे गोव्याच्या दिशेने जातो या कालव्याचे तसेच पाईपलाईनचे मजबुतीकरण करणे, नळ योजना विहिरीच्या बाजूने संरक्षण भिंत बांधणे, घोटगे वरचीवाडी येथे कालव्यावर रेलिंग बसविणे, घोटगे गावातील शेतीमध्ये जाण्यासाठी कालव्याच्या बाजूने रस्ता करणे, कालव्यावरून खाली उतरण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्या बांधणे.. या पाच मागण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय घोटगे या ठिकाणी उपोषण सुरू केले होते. १ मे रोजी सकाळी दहा वाजता सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी विनायक जाधव, अभियंता मेहेत्रे, उप अभियंता गुजर, तसेच पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. उपोषणकर्त्यांनी केलेल्या मागण्यांची पाहणी घटनास्थळी जाऊन जाधव यांनी केली. सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg