loader
Breaking News
Breaking News
Foto

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी देवबाग येथील संशयितास सत्र न्यायालयात सशर्त जामीन मंजूर

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तारकर्ली नाका येथील गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठवणुकीच्या गुन्ह्यामधील दुसरा अटक संशयीत ॲलेक्स दुमिंग लुद्रिक वय 26 वर्षे, राह. देवबाग ता..मालवण याला ओरोस येथील सत्र तथा जिल्हा न्यायालयाने पन्नास हजार रुपयाचा सशर्त जामीन मंजूर केला आहे . संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड यतिश खानोलकर यांनी काम पाहिले. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी मालवण तारकर्ली नाका येथे केलेल्या छाप्याकामी महालक्ष्मी जनरल स्टोअरच्या बाजूच्या शेडमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा मिळून आल्याने अमित अशोक सावंत, रा. भरड मालवण याचे विरूद्ध मालवण पोलीस ठाण्यात दि. 03 जून 2026 रोजी भारतीय न्याय संहिता कलम 123 व अन्नसुरक्षा आणि मानके कायदा कलम 26(2), 27(3), 30(2) व 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याचेकडे केलेल्या तपासात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री देवबाग येथील ॲलेक्स लुद्रीक याने केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ॲलेक्स दुमिंग लुद्रिक वय 26 वर्षे, रा. देवबाग यास दि. 17 जून 2026 रोजी अटक करुन मालवण न्यायालयात हजर केले असता मालवण न्यायालयाने संशयीतास दि. 18 जून 2026 रोजी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर संशयीताच्यावतीने ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता. या जामीन अर्जाचे सुनावणीअंती जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयीतास रक्कम रु. 50 हजार रुपयाचा सशर्त जामीन मंजूर केला. यामध्ये संशयीताने तपासकामात ढवळाढवळ न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे व पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg