loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा येथे निरंकारी मंडळाचा इंग्लिश सत्संग पार पडला

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाने रविवार दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ९. ३०ते १२. ३० वा या वेळेत संत निरंकारी मंडळाचा इंग्लिश सत्संग परम गणेश गोडे (कणकवली) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्संग भवन धुंदरे रोड लांजा येथे संपन्न झाला. यावेळी संत निरंकारी मंडळ लांजा, बाल संत महात्मे भगिनी, बुजुर्ग मंडळी यांनी आपले इंग्रजीतून मराठी व हिंदीतून गीत विचार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परमेश्वर हा सर्व काही आहे, आज आहे, काल होता, उद्याही राहील. त्याला सद्गुरूच्या कृपेने जाणता येते व मानवी जीवनाचे सार्थक साधता येते असे विचार आदरणीय घोडेजी यांनी उपस्थितांसमोर मांडले. मानवी जीवनाला समर्पक असे उदाहरणे दिली. परमेश्वरर हा निराकार असून नियंत्रण आहे. त्याच्या अज्ञानेच सर्व गोष्टी चालतात सजीव चालतो आणि त्याच्याच कृपेने जीवन सफल होते असे मत मांडले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका नामे हिनी केले. यावेळी सेवादल संचालक प्रकाश रसाळ लांजा, मुखी चंद्रशेखर बेंडखळे लांजा युनिट, शिक्षक दिलीप दाभोळकर, इंग्लिश सत्संग इन्चार्ज मंदार बंडभबेजी, प्रेस विभाग विश्वास मांडवकर व सेवादल, लांजा येथील बाल सत्संग माता-भगिनी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg