मुंबई : भायखळा मोहरम केस (Byculla Muharram Case) हा मुंबईच्या इतिहासातील एक मोठा विषप्रयोग आणि घातपाताचा कट होता, जो मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) उधळून लावला. या प्रकरणात हजारो भाविकांना टार्गेट केले गेले होते. भायखळा येथे मोहरमच्या जुलूसमध्ये पेनकिलरच्या नावाखाली विषारी गोळ्या वाटण्याचा एक मोठा कट मुंबई पोलिसांनी उधळला आहे. पुणे येथील रहिवासी असलेल्या ४१ वर्षीय फैयाज निसार हुसैन प्रेमजी याला मुंबई पोलिसांनी गोळ्या वाटत असताना अटक केली आहे. या आरोपीकडून सुमारे १४,९०० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात या कॅप्सूलमध्ये ‘झिंक फॉस्फाईड’सारखे विषारी रसायन आढळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, झिंक फॉस्फाईडचा वापर सहसा उंदीर मारण्याचे औषध म्हणून केला जातो. मात्र, या प्रकरणातील अंतिम फॉरेन्सिक रिपोर्टची अद्याप प्रतीक्षा आहे.
मोहरम मिरवणुकी दरम्यान दक्षिण मुंबईतील भायखळा-रे रोड परिसरात पोलिसांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती लोकांना मोफत कॅप्सूल वाटत आहे. आरोपी कथितपणे या कॅप्सूल वेदनाशामक (पेनकिलर) आहेत आणि आरोग्यासाठी चांगल्या असल्याचे सांगून लोकांना घेण्यास सांगत होता. माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून तब्बल १४,९०० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या.
मुंबई पोलिसांच्या मते, प्राथमिक तपासात जप्त केलेल्या कॅप्सूलमध्ये ‘झिंक फॉस्फाईड’ असण्याची शक्यता आहे. आरोपीने चौकशी दरम्यान सुमारे ३० हजार रिकाम्या कॅप्सूल मागवल्याची आणि त्यात विषारी पदार्थ भरल्याची कबुली दिली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हे झिंक फॉस्फाईड कुठून खरेदी केले गेले, कॅप्सूल कुठे तयार करण्यात आल्या आणि या संपूर्ण कटात इतर कोणी सामील होते का, याचाही तपास केला जात आहे.


















































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.