संगमेश्वर (प्रतिनिधी) - संगमेश्वर पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू पदार्थांचा साठा जप्त केला असून या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पारेख पेट्रोलपंपासमोर रस्त्याच्या साईडपट्टीवर करण्यात आली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-१४/बीके/४१२० क्रमांकाची सुझुकी कंपनीची वॅगनआर कार संशयास्पद अवस्थेत उभी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. वाहनात मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू पदार्थ आढळून आले. दरम्यान, गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर संशयित चालकाने वाहन लॉक करून घटनास्थळावरून पलायन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या कारवाईत विमल पान मसाला, विविध प्रकारची सुगंधित तंबाखू तसेच प्रिमियम आरएमडी पान मसाला असा एकूण सुमारे रु. ५ लाख ४६ हजार ६०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच संबंधित वॅगनआर कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६०/२०२६ अन्वये बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल कृणाल चिंतामणी घोलप यांनी दिली असून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन संशयित मालाची तपासणी केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोउनि प्रविण देसाई हे करीत आहेत.





























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.