रत्नागिरी : त्याग, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र सण 'ईद अल-अजहा' म्हणजेच बकरी ईद रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील खतीब मोहल्ला येथे अत्यंत उत्साहात, पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. सकाळी खतीब मोहल्ल्यातील आणि परिसरातील मुस्लिम बांधव पारंपरिक आणि नवीन पोशाख परिधान करून येथील मुख्य जुम्मा मशिदीमध्ये एकत्र आले होते. यावेळी मशिदीमध्ये ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. नमाजानंतर मशिदीच्या धर्मगुरूंनी ईदचे महत्त्व सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या पवित्र प्रसंगी देशात सर्वत्र शांतता लाभो, सुख-समृद्धी नांदो आणि सर्व धर्मीयांमध्ये बंधुभावाची भावना अधिक दृढ होवो, यासाठी सामूहिक विशेष प्रार्थना (दुआ) करण्यात आली.
नमाज संपन्न झाल्यानंतर मशिदीच्या बाहेर आणि मोहल्ल्यात सर्व नागरिकांनी एकमेकांना मिठी मारून 'ईद मुबारक' म्हणत शुभेच्छा दिल्या. या आनंदोत्सवात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत होता. लहान मुलांनी नवीन कपडे घालून बालहट्ट पुरवून घेत ईदचा आनंद लुटला, तर ज्येष्ठांनी एकमेकांच्या घरी भेटी देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला. "ईद अल-अजहा हा सण आपल्याला केवळ त्यागाची शिकवण देत नाही, तर समाजात एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर कसा बाळगावा हे देखील शिकवतो," अशा भावना यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या. ईदच्या निमित्ताने खतीब मोहल्ल्यात विविध ठिकाणी समाजबांधव एकत्र आले होते. एकमेकांच्या घरी जाऊन शिरखुरमा आणि विशेष पदार्थांचा आस्वाद घेत नागरिकांनी हा सण साजरा केला. या सणाच्या माध्यमातून खतीब मोहल्ल्यातील नागरिकांनी समाजात आपुलकी, प्रेम आणि सामाजिक ऐक्याचा एक सुंदर संदेश दिला. दरवर्षीप्रमाणे यंदाही खतीब मोहल्ला आणि सैतवडे परिसरातील हा सलोखा आणि पारंपरिक पद्धत पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरली .





























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.