loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळे परिसरात बीएसएनएलची रेंज गायब; ग्राहकांत नाराजी

साखरपा (दीपक कांबळे) : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे गाव परिसरात भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ची मोबाईल रेंज मिळत नसल्याने असंख्य ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोबाईल सेवा सुरू झाल्यापासून ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांनी बीएसएनएलची सेवा खरेदी करून वापरात ठेवली होती. मात्र, अलीकडच्या काळात दाभोळे परिसरात नेटवर्कची समस्या गंभीर बनली असून ग्राहकांना कॉलिंग व इंटरनेट सेवांचा लाभ मिळत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही दिवसांपूर्वी मोबाईल हँडसेटवर बीएसएनएलची रेंज दिसत असली तरी प्रत्यक्षात कॉल लागत नसल्याची समस्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकरी वर्गाकडे शेतकरी सिमकार्ड उपलब्ध असूनही नेटवर्क अभावी त्यांना योजनांचा व सेवांचा लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. दाभोळे परिसरातील बीएसएनएल सेवा भारत संचार निगमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने पूर्ववत करून ग्राहकांना सुरळीत मोबाईल सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg