सावंतवाडी (प्रतिनिधी) : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा थेट फटका आता स्थानिक पातळीवर बसू लागला असून, सावंतवाडी शहरात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जाणवू लागली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पेट्रोल पंपांवर इंधनाची काटकसर सुरू करण्यात आली असून, वाहनधारकांना मर्यादित स्वरूपात इंधन दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडीतील पेट्रोल पंपांवर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. इंधनाचा साठा मर्यादित असल्याने प्रशासकीय स्तरावर किंवा पंप चालकांकडून काटकसरीचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार सध्या दुचाकी वाहनांना एका वेळी जास्तीत जास्त २०० रुपयांचे, तर चारचाकी वाहनांना केवळ ५०० रुपये किमतीचेच पेट्रोल देण्यात येत आहे. अचानक लागू झालेल्या या नियमांमुळे वाहनधारकांमध्ये काहीसा गोंधळ आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील विस्कळीत पुरवठ्यामुळे देशात महागाईचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन आणि एलपीजी गॅसचा वापर अत्यंत जपून व काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे सातत्याने होणारी दरवाढ आणि दुसरीकडे आता सुरू झालेली इंधन कपात, यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार आणि व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. इंधनाचा हा तुटवडा पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.





























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.