loader
Breaking News
Breaking News
Foto

माजगाव येथे टी बी मुक्त अभियान आरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी - केंद्र व राज्य शासनाच्या अभियानातंर्गत माजगाव येथे टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान आयुष्यमान आरोग्य मंदिर माजगाव तर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन माजगाव ग्रामपंचायत येथे मंगळवार दिनांक 26/5/26 सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आले. यावेळी गावातील 107 लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी एक्स-रे,ईसीजी, मधुमेह, रक्तदाब तपासणी या शिबिरात करून घेतली. या आरोग्य शिबिरासाठी माजगाव ग्रामपंचायत सरपंच रंजना कानसे यांंनी ग्रामपंचायत मधील जागा उपलब्ध करून दिली. यावेळी CHO डॉक्टर सुप्रिया धाकोरकर, ANM प्रतिभा नाईक MPW रोहन भरणे, एक्सरेसाठी जिल्हा रुग्णालय ओरस कर्मचारी यांनी उपस्थीत ग्रामस्थांची तपासणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिबीराची जनजागृती माजगावमधील आशा सुजाता धुरी, नेहा जाधव, गायत्री मयेकर, शिला डिमेलो, अक्षता सावंत, अर्चना सावंत व उपकेंद्र माजगाव मदतनीस सुजाता सावंत यांनी केली. डॉ. सुप्रिया धाकोरकर बोलताना म्हणाल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून गावच्या सर्वांगीण सुधारण्यास व्यापक व्यासपीढ आहे. निरोगी शरीर तर सुखी जीवन यामध्ये मूलभूत आरोग्य सेवा, पोषण, स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, जनजागृती यांचा समावेश असून आरोग्य हे ग्रामविकासाच्या केंद्रस्थानी असल्याचे प्रतिपादन केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी माजगाव ग्रामपंचायत उपसरपंच रिचर्ड डिमेलो, सदस्य संजय कानसे, मधु कुंभार, ज्ञानेश्वर सावंत, अशोक धुरी ग्रामविस्तार अधिकारी आनंद परब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, चंद्रकांत कासार, माजगाव ग्रंथालय अध्यक्ष चंद्रकांत सावंत (गुरुजी) लिपीका रोशनी निब्रे आदींनी या शिबिरास भेट दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आशा सेविका नेहा जाधव यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg