loader
Breaking News
Breaking News
Foto

कॉकरोज जनता पार्टी पेजविरोधात कारवाईची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) - सोशल मीडियावर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे फोटो वापरून खोट्या व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी भाजयुमोचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप चंद्रकांत मेस्त्री यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी शहर अध्यक्ष सागर राणे, उपाध्यक्ष प्रशांत राणे,गणेश तळगावकर,ऋतिक नलावडे, भालचंद्र वरवडेकर, तुषार मोर्ये,ओंकार सुतार, श्रेयस चिंदरकर,नितीन पवार, चेतन पवार, रोहित ठाकूर, गोपाळ बागायतकर, स्वप्निल वर्दम आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कॉकरोज जनता पार्टी या इन्स्टाग्राम पेजवरून भाजपच्या सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे फोटो वापरून त्यांना संबंधित पक्षाचे पदाधिकारी असल्याचे भासवणाऱ्या पोस्ट तयार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या पोस्ट सातत्याने सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने संबंधितांची सामाजिक बदनामी होत असून मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे मेस्त्री यांनी म्हटले आहे. तसेच या पोस्टमुळे समाजामध्ये गैरसमज निर्माण होत असून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या प्रकारामागील समाजकंटकांचा शोध घेऊन संबंधितांवर तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा अशा समाजकंटकांविरोधात पुढाकार घ्यावा लागेल असा इशाराही तक्रारीत देण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg