loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात पोलिसांच्यावतीने बाल अत्याचार विरोधी पथनाट्याद्वारे जनजागृती

मालवण (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून पोलीस काका, पोलीस दीदी उपक्रमातंर्गत कुडाळच्या बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थांनी "उंबरठ्या मागचे वादळ" हे बाल अत्याचार विरोधी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण रॉक गार्डन येथे सिंधुदुर्ग पोलीस आणि मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा प्रसंगी सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या बँड पथकाने आपल्या कलेचे सादरीकरण केले. मालवण रॉक गार्डन या ठिकाणी पर्यटक तसेच लहान मुलांची नियमित वर्दळ असल्याने सिंधुदुर्ग पोलीस आणि मालवण पोलीस यांच्या वतीने कुडाळच्या बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थांनी 'बाल अत्याचार विरोधी' पथनाट्य सादर करत जनजागृती केली.

टाईम्स स्पेशल

यावेळी मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप, ए. पी. आय. गणेश माने, डब्ल्यु.पी.एस.आय. प्रतिज्ञा खोत, पी.एस.आय. खाडे, सावंत, गावडे, समुपदेशक महेंद्र जाधव, महिला समुपदेशन केंद्र पोलीस स्टेशन आवर कुडाळ, बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग कुडाळ चे प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg