loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडचे ओमप्रकाश लढ्ढा यांची रत्नागिरी जिल्हा माहेश्वरी समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्हा माहेश्वरी समाजाची बैठक रविवार दिनांक २४ मे २०२६ रोजी पार पडली. या सभेत नवीन पदाधिका-यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या नवनिर्वाचिंत पदाधिका-यांची निवड सन २०२६ २०२९ पर्यंत राहणार आहे. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये ओमप्रकाश लढ्ढा जिल्हाध्यक्ष, अंकुश मुंदडा उपाध्यक्ष, सुरेंद्र मर्दा-कोषाध्यक्ष, किशोर लढा सचिव, राजेश पल्लोड, कार्यकारिणी सदस्य मनोज मणियार, कार्यसमिती सदस्य वरील -सर्व पदाधिका-यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत (राजूशेठ) सोनी यांनी काम पाहिले आणि संपूर्ण निवड घोषित करण्यात आली. त्याबद्दल जिल्हा सभेतर्फे त्यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले. ओमप्रकाश लढ्ढा हे खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ व खेड तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळावर देखील आहेत. ओमप्रकाश लढ्ढा यांचे काम तर कौतुकास्पद आहेच, स्पष्ट विचार मांडणारे, सदाहसतमुख राहणारे व्यक्तिमत्त्व असुन अनेक क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांच्या शिरपेचात आणखीन एक कर्तृत्वाचा तुरा खोवला गेला असुन जबाबदारी वाढली आहे.

टाईम्स स्पेशल

अभ्यासू, तसेच दांडगा जनसंपर्क व अनुभवाच्या जोरावर ही निवड कौतुकास्पद आहे. त्यांचे संघटन कौशल्य कौतुकास्पद आहे. संघटन करताना सर्वानाच बरोबर घेऊन कार्यरत राहाणे ही एक वाखाणण्याजोगी बाब आहे. लढ्ढा हे सामाजिक बांधिलकीतून माहेश्वरी समाजाला न्याय मिळवून देण्यात प्राधान्य देण्यास पावले उचलतील. त्यांच्या अभ्यासक वृत्तीचा फायदा माहेश्वरी समाजाला होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg