पनवेल(प्रतिनिधी) - साहित्यिक आणि लोककलावंतांमध्ये मनापासून रमणारे लोकनेते, असे गौरवोद्गार पानिपतकार तथा ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पनवेल येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याविषयी काढले. कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा आणि नवीन पनवेल शाखेच्यावतीने लोकनेते, माजी खासदार तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे सल्लागार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त “एक कृतार्थ संध्याकाळ” या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून पानिपतकार विश्वास पाटील बोलत होते.
या कार्यक्रमास कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ कवी व चित्रपट निर्माते दिग्दर्शक रामदास फुटाणे, सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, कोमसापचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ, ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, युवा नेते नगरसेवक परेशशेठ ठाकूर, महापौर नितीन पाटील, भाजपा नेते वाय.टी.देशमुख, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पनवेल पंचायतीच्या सभापती रंजना वासकर, सुप्रसिद्ध गझलकार ए.के.शेख तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रा.एल.बी.पाटील, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते प्रकाश बिनेदार, कोमसापचे रायगड जिल्हा अध्यक्ष संजय गुंजाळ, नवीन पनवेल कोमसापचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्यासह लोकप्रतिनिधी, साहित्यिक आणि रसिक उपस्थित होते.
लोकनेते माजी खासदार कोकण मराठी साहित्य परिषदेचे सल्लागार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात, साहित्य समाज घडवण्याचे काम करतो. साहित्यिक स्फूर्ती देतात, उभारी देतात. साहित्यिकांच्या शुभेच्छांमुळे निश्चितच माझे आयुष्य वाढेल. आयुष्यात गरिबी, श्रीमंती, कष्टाचे अनुभव मी पाहिले आहेत. रयत शिक्षण संस्थेमुळे संस्कार मिळाले. आपण प्रामाणिकपणे काम केले तर एक यशस्वी नागरिक होऊ शकतो. लोकांनी मला रामशेठ बनवले, पण मी अजूनही रामशेठ झालो नाही. पैसे कमवले पण वृत्तीने आणि भावनेने मी शेठ झालो नाही. साहित्यिकांमुळे मी कृतार्थ झालो अशी शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेसाठी २५ लाखाची देणगी जाहीर केली.





































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.