पनवेल : "ज्यांनी आपल्याला प्रखर राष्ट्रभक्ती आणि देशाभिमान शिकवला, तसेच जगण्याची शाश्वत अशी जीवनमूल्ये दिली, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवरच आज संपूर्ण देश प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाची ही घोडदौड सुरू आहे," असे प्रतिपादन पनवेलचे महापौर नितीन पाटील यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना महापौर नितीन पाटील म्हणाले की, सावरकरांचे जीवन आणि त्यांचे विचार प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी दिलेली जीवनमूल्ये आजही तितकीच प्रासंगिक असून, देशहितासाठी ती अंगीकारणे गरजेचे आहे. कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून महापौरांनी उपस्थितांचे आभार मानले. "आपण सर्वजण अत्यंत उत्साहामध्ये या कार्यक्रमाला एकत्र जमलात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो," अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी सर्वांना सावरकर जयंतीच्या पुनश्च शुभेच्छा देऊन 'जय हिंद, जय महाराष्ट्र'च्या घोषणांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, गणेश कडू, नगरसेवक अजय बहिरा, सुमित झुंजारराव, प्रिती जाॅर्ज, स्नेहल ढमाले, केशवस्मृती पतपेढीचे चेअरमन अमित ओझे, अभिषेक पटवर्धन, भाजपचे शहर मंडळ उपाध्यक्ष केदार भगत, सरचिटणीस रूपेश नागवेकर, चिन्मय समेळ, अनिमेष ओझे, ॲड.प्रफुल्ल म्हात्रे, पतपेढीचे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र गोडबोले, सुषमा भिडे, विनीता जोशी, स्वाती कोळी, संजय कदम, विशाल सावंत, केशवस्मृती पतपेढीचे कर्मचारी, स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.