loader
Breaking News
Breaking News
Foto

नॅशनल लेवल अ‍ॅबॅकस परीक्षेमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

खेड (प्रतिनिधी) - क्रिस्ट अ‍ॅबॅकस अ‍ॅकॅडमी यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल लेवल अ‍ॅबॅकस परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून पुढील पातळीसाठी प्रविष्ट होण्याचा बहुमान प्राप्त केला. यामध्ये विद्यार्थ्यांना ठराविक वेळेत बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकाराची अनेक उदाहरणे सोडवण्याचे आव्हान देण्यात आले होते. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी कोणत्याही साधनाचा वापर न करता केवळ मानसिक क्षमतेच्या जोरावर अचूक उत्तरे दिली. सदरच्या राष्ट्रीय अ‍ॅबॅकस परीक्षेमध्येे इयत्ता पहिलीतील कु. समायरा आखाडे, कु. खदिजा सुर्वे, कु. समर्थ कदम, कु. मोहम्मद पोत्रिक, कु. सान्वी नाचरे, कु. शिवांश माने. इयत्ता दुसरीतील कु. माहिरा पाटणे, कु. काव्या मणियार, कु. स्वजल कांबळे, कु. अदिबा तांबे, कु. राघव देशमुख, कु. श्रितिक गांधी, कु. निमिष किरतकर. इयत्ता तिसरीतील कु. राधा भोसले, कु. आरुष हरावडे, कु. शौर्य पाटील. इयत्ता चौथीतील कु. आराध्या कासार, कु. गिरीजा कोठारे, कु. रिआन चव्हाण, कु. शिवम खोपकर, कु. अरहम परकार, कु. शौर्या मोरे, कु. सानिष बुटाला, कु. राही माळी. इयत्ता पाचवीतील कु. आयुष पाटील, कु. कनिष्का भगत, कु. वीर मोरे, कु. रुद्रनील मोहिते, कु. अनया पाटणे. या विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४८ विद्यार्थी, ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये २५ विद्यार्थी. ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये ८ विद्यार्थी. ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये ५ विद्यार्थी. ६० टक्क्यांपेक्षा कमी गुण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व विद्यार्थ्यांना शैलेश देवळेकर, सौ. प्रितम वडके, सौ. सारिका तटकरे, सौ. श्रुती दिंडे, सौ. प्रियांका पंडीत, सौ. अमूल्या शेणॉय, सौ. वैशाली मुद्राळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg