loader
Breaking News
Breaking News
Foto

विशाल हिंदू संमेलन दि.४ मे रोजी शृंगारतळी येथे

वरवेली (गणेश किर्वे) - हिंदू धर्म, संस्कृतीचे रक्षण आणि समाज संघटीत करुन या देशाला परमवैभव प्रन्हा प्राप्त होणे हे या देशातील प्रत्येक सजग नागरीकाचे स्वप्न आहे. याच ध्येयाच्या प्राप्तीसाठी शृंगारतळी व परिसरातील गावात राहणाऱ्या हिंदू समाजाचे विशाल हिंदू संमेलन शृंगारतळी पालपेणे रोड येथील भवानी सभागृह येथे सोमवार दि. ४ मे २०२६ रोजी सायं. ४ वाजता आयोजित करण्यात आले आहे. देव, देश आणि धर्मासाठी हिंदू समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आपण एकत्र आलो तर हिंदू समाजावरील आघातांचा प्रतिकार करणे, समस्यांचे निराकरण करणे आणि बलशाली, समृद्ध समाज घडविणे शक्य होईल. याची सुरुवात म्हणून या संमेलनात सर्व हिंदुनी पूर्ण शक्तीने तन, मन, धन अर्पूण सहभागी व्हावे, या धर्मकार्यासाठी आपल्याशी संपर्क करणाऱ्या धर्म बंधूंना आपण पूर्ण सहकार्य करुन संमेलनाकरिता उपस्थित राहून संमेलन यशस्वी करुया, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. या विशाल हिंदू संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवतेज फाउंडेशनचे संस्थापक वकील संकेत साळवी तसेच प्रमुख वक्ते म्हणून रत्नागिरी-सिंधुदूर्ग रा.स्व.सं.मा.विभाग संघचालक, दत्ताराम गंगाराम सोलकर मार्गदर्शन करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg