रत्नागिरी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. सलग १५ व्या वर्षी कोकण बोर्डाने राज्यात ९४.१४ टक्के निकालासह अव्वल क्रमांक मिळवला आहे. तर लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल नोंदवला आहे. यावर्षी देखील कोकणात मुलींनी निकालात बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर झाला. कोकण बोर्डाच्या विभागीय प्रभारी सचिव पुनिता गुरव यांनी कोकण बोर्डाच्या निकालाची माहिती दिली. यावेळी लेखाधिकारी सायली जाधव, शाखाप्रमुख गजानन जाधव आदी उपस्थित होते.
राज्यात फेब्रुवारी-मार्च २०२६ ची लेखी परीक्षा ६ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पार पडली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४१ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये रत्नागिरीतील १५४ तर सिंधुदुर्गमधील ८७ कनिष्ठ महाविद्यालये सहभागी झाली होती. या परीक्षा एकूण ६१ परीक्षाकेंद्रांवर घेण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यात ३८ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ अशी ६१ परीक्षाकेंद्र होती. या परीक्षाकेंंद्रांवर २४१ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील १५,०११ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९,०७२ असे मिळून २५,७९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २५,१५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील १३,९९८ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७,६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९३.१८ तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९५.९४ टक्के इतका लागला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९६.७९ टक्के लागला आहे तर कला शाखेचा ८७.४० आणि वाणिज्य शाखेचा ९२.८५, व्यावसायिक ९५.८५, टेक्निकल सायन्सचा निकाल ९१.०३ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९८.९० टक्के लागला आहे तर कला शाखेचा ९१.२० आणि वाणिज्य शाखेचा ९५.९९, व्यावसायिक ९३.२४, टेक्निकल सायन्सचा निकाल ७१.०५ टक्के इतका लागला आहे. यावर्षी कोकण बोर्डातून ११,५०० विद्यार्थी व ११,३८८ विद्यार्थीनी प्रविष्ट झाल्या होत्या. त्यातील १०,५२६ विद्यार्थी तर ११,०२२ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे उत्तीर्णचे प्रमाण ९१.५३ टक्के इतके असून विद्यार्थीनींचे उत्तीर्णचे प्रमाण ९६.७८ टक्के आहे. यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे. कोकण बोर्डामध्ये एक कॉपीच प्रकरण घडले होते यावर्षी मात्र कोकण बोर्ड कॉपीमुक्त झाले आहे. यावेळी परीक्षा केंद्रात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली परीक्षा घेण्यात आल्या त्यामुळे अत्यंत पारदर्शक पद्धतीने परीक्षा पार पडल्या.






























































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)





















































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.