loader
Breaking News
Breaking News
Foto

बारावी परीक्षेत वैभववाडी तालुक्याचा निकाल 97.97 टक्के

वैभववाडी (प्रतिनिधी) - बारावी परीक्षेत वैभववाडी तालुक्याचा निकाल 97.97 टक्के इतका लागला आहे. कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आकांक्षा अजित खाडे हिने 90.17टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर याच कनिष्ठ महाविद्यालयाची कला शाखेची विद्यार्थिनी निहारिका विठोबा पाटील हिने 90 टक्के गुण मिळवत द्वितीय तर संपदा प्रीतम जाधव हिने 89.33 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. तालुक्यातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारे तिन्ही विद्यार्थी हे कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे असून महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कनिष्ठ महाविद्यालय निहाय निकाल खालीलप्रमाणे - कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी कला शाखेतून 40 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक- निहारिका विठोबा पाटील 90 टक्के, द्वितीय क्रमांक- संपदा प्रीतम जाधव 90.36 टक्के, तृतीय क्रमांक- प्रिया चंद्रकांत माळकर 71.83 टक्के. या महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून 79 विद्यार्थी प्रविष्ट होते. ते सर्व उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या शाखेतून प्रथम क्रमांक- आकांक्षा अजित खाडे 90.17 टक्के, द्वितीय क्रमांक- पायल प्रताप लिंगायत 80.17 टक्के, तृतीय क्रमांक- कृष्णा संदीप घाडी 85.17 टक्के. विज्ञान शाखेतून 87 विद्यार्थी प्रविष्ट होते. ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्यामुळे शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक- गौरी संजय चव्हाण 79.83 टक्के, द्वितीय क्रमांक- यश अशोक पाटील 79 टक्के, तृतीय क्रमांक- प्रीती नितीन रावराणे 77 टक्के.

टाइम्स स्पेशल

आचिर्णे आर्ट कॉमर्स अँड सायन्स जुनिअर कॉलेज या कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून 98 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यापैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल 95.91 टक्के लागला आहे. शाखेतून प्रथम क्रमांक- श्रेया संदीप शेळके 83 टक्के, द्वितीय क्रमांक- सखाराम मोतीराम गुरखे 75.88 टक्के, तृतीय क्रमांक- श्रुती संतोष कदम 69 टक्के. विज्ञान शाखेतून 31 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा 93.56 टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक- समीक्षा रामदास शेलार 76.50 टक्के, द्वितीय क्रमांक- रोशनी रवींद्र शिंदे 72.17 टक्के, तृतीय क्रमांक- सिद्धी सूर्यकांत मांडवकर 66.17 टक्के. शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नेर्ले तिरवडे या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९२.८५ टक्के लागला आहे. कला शाखेतून एकूण 14 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यापैकी तेरा उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक-सिद्धीका हरिश्चंद्र गुरव 66.33 टक्के, द्वितीय क्रमांक- पूजा दशरथ सुतार 56.83 टक्के, तृतीय क्रमांक- ऋतुजा संतोष आयरे 53.83 टक्के. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे वैभवाडी तालुक्यात अभिनंदन केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg