loader
Breaking News
Breaking News
Foto

कट्टा वराडकर कॉलेजचा बारावीचा निकाल ९५.६९ टक्के

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ९५.६९ टक्के लागला. या कॉलेजमधून बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ९३ विद्यार्थ्यांपैकी ८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ८६.२० टक्के लागला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वराडकर कनिष्ठ महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक - वैदेही सचिन पालकर (५६९), द्वितीय क्रमांक - निधी राजेश सावंत (४८५), तृतीय क्रमांक- कामिनी संतोष पाटकर ( ४६५) यांनी यश मिळविले.

टाइम्स स्पेशल

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, सचिव विजयश्री देसाई, उपाध्यक्ष आनंद वराडकर, उपाध्यक्ष शेखर पेणकर, स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक देवयानी गावडे, पर्यवेक्षक भाट, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg