loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.७३ टक्के, वराडकर कॉलेजची वैदेही पालकर तालुक्यात प्रथम

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत मालवण तालुक्याचा निकाल ९५.७३ टक्के एवढा लागला आहे. मालवण तालुक्यातून बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ७५१ विद्यार्थ्यांपैकी ७१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कट्टा येथील वराडकर ज्युनियर कॉलेजची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी वैदेही सचिन पालकर हिने ५६९ गुण मिळवीत मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तर काळसे येथील स्व. जयश्री वामन प्रभू कला व वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेच्या सखाराम विकास गोसावी याने ५५९ गुण मिळवीत तालुक्यात द्वितीय क्रमांक व मालवण येथील टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या निखिल नंदकुमार भुर्के याने ५३७ गुण मिळवीत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकविला. मालवण तालुक्यातून बारावी परीक्षेसाठी ३९८ मुलगे प्रविष्ठ झाले त्यापैकी ३७५ मुलगे उत्तीर्ण झाले. तर ३५३ मुलींपैकी ३४४ मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्यात ५५ विद्यार्थ्यांनी विशेष प्रविण्य श्रेणी मिळविली. तर प्रथम श्रेणीमध्ये २२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच द्वितीय श्रेणीत ३५५ आणि उत्तीर्ण श्रेणीत ८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण तालुक्यातून पोईप येथील इं. द. वर्दम कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आणि कट्टा येथील वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल या दोन कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. तर भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९४.७३ टक्के, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९४.३३ टक्के, ना. अ. दे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६.८६ टक्के, टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्होकेशनल शाखेचा निकाल ८० टक्के, कट्टा येथील वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९५.६९ टक्के, आचरा न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेजचा निकाल ९३.८७ टक्के, काळसे येथील स्व. सौ. जयश्री वामन प्रभू कला व वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६ टक्के, मसुरे येथील एम. जी. बागवे उच्च माध्यमिक व्यावसायिक शिक्षण कॉलेजचा निकाल ८५.७१ टक्के लागला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg