loader
Breaking News
Breaking News
Foto

पोईपच्या वर्दम कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के

पोईप (वार्ताहर) - पोईप विरण येथील सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला व वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या कनिष्ठ महाविद्यालयातून परीक्षेस प्रविष्ठ झालेले सर्व २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये वाणिज्य शाखेतून प्रथम - दिव्या संतोष घाडीगावकर (४९५), द्वितीय - नितीशा शैलेश परब (४१५), तृतीय - गुरुराज मंगेश महाजन (४०७) यांनी यश मिळविले. तर कला शाखेतून प्रथम - पूजा चंद्रशेखर परकर (३३९), द्वितीय - आदित्य विलास मेस्त्री (३१४), तृतीय - निशांत योगेंद्र परब (२४६) यांनी यश मिळविले.

टाइम्स स्पेशल

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर, सचिव विलास माधव, उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, सर्व विद्यमान संचालक, प्राचार्य/ मुख्याध्यापक कुंभार, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg