मालवण (प्रतिनिधी) - मालवण मेढा येथील सचिन सत्यवान टिकम यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीला अचानक आग लागून पडवीतील विविध साहित्य जळून खाक झाले. स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नातून या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.
मेढा येथील शंकर मंदिर नजिक राहणाऱ्या सचिन टिकम यांचे स्लॅबचे घर असून घराच्या मागील बाजूस पडवी आहे. सचिन टिकम हे घरी एकटे असताना पडवीला अचानक आग लागली. आग लागल्याचे शेजारील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तिथे धाव घेत टिकम यांना माहिती दिली. आग लागल्याचे समजताच टिकम यांची पत्नी शुभदा व मुलगा अद्वैत यांनीही घराकडे धाव घेतली. यावेळी टिकम कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी विहिरीतील पाण्याचा मारा करत ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
या आगीत पडवीत ठेवलेले नाटकाचे दोन सेट, नवीन चौकटी व दरवाजे, पाईप लाईन, वॉशरूमचे दरवाजे, पाचशे नारळ, तसेच पडवीचे पत्रे जळून खाक झाल्याने सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. तर बाजूलाच असलेले माडाचे झाडही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने झाडाचे मोठे नुकसान झाले. स्थानिकांच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, तसेच त्यानंतर मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन मोटरसायकलद्वारेही पाण्याचा मारा करण्यात आला. यावेळी नगरसेवक सुदेश आचरेकर व इतर नागरिक उपस्थित होते. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)






















































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.