loader
Breaking News
Breaking News
Foto

खास. सुनील तटकरे यांच्या हस्ते मोहपाडा येथे विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात

रसायनी (राकेश खराडे) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वासांबे विभागाच्या वतीने आयोजित एका भव्य सोहळ्यात रायगडचे लोकनेते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते विविध जनहितार्थ विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. हा सोहळा मोहोपाडा येथील जनता विद्यालय परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. ​शिक्षण क्षेत्रातील प्रगतीचा विचार करून खासदार तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा येथील जनता विद्यालयात संगणक, प्रिंटर आणि इंटरॅक्टिव्ह पॅनल बसविण्यात आले आहेत. या सुविधेमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच डिजिटल शिक्षणाची दारे खुली झाल्याने पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी नियुक्ती करुन त्यांना खासदार सुनिल तटकरे यांच्याहस्ते निवडपत्र देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच ​ग्रुप ग्रामपंचायत वासांबे अंतर्गत सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत गावातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये सोलर पथदिवे आणि हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे गावाचा परिसर उजळून निघाला असून ग्रामस्थांची सुरक्षितता आणि सोय वाढली आहे.​ ​या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सरपंच उमाताई मुंढे, माजी सरपंच संदीप मुंढे, ग्रामसुधार मंडळाचे पदाधिकारी, सुधाकर घारे, जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे, अंकीत साखरे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खालापूर तालुका सचिवपदी नामदेव कोकंबे, रसायनी विभागीय अध्यक्षपदी हरेश उतेकर आदीची निवड करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या ठिकाणी 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वासांबे विभागा'च्या वतीने जंगी तयारी करण्यात आली होती. ​या विकासकामांबद्दल बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, "ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे ही आमची प्राथमिकता आहे. शिक्षण आणि मूलभूत पायाभूत सुविधांच्या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." ​या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी वासांबे विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg