loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत सापडले झाबुवा खून प्रकरणातील संशयित

रत्नागिरी - कोतवाली झाबुवा पोलीस ठाणे, जि. झाबुवा राज्य. मध्यप्रदेश येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 340/2026,भारतीय न्याय संहिता कलम 191(1), 191(2), 191(3), 190, 103(1), 296(1), 351(2) अन्वये नोंद असलेल्या खून प्रकरणातील संशयित आरोपी रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आले आहेत. या गुन्ह्यातील संशयित आरोपी म्हणून 1) दाउद सन ऑफ चिलिया वाकला 2) नब्बु सन ऑफ चिलिया वाकला 3) चिलिया सन ऑफ कलिसींग वाकला सर्व रा. झाबुवा मध्यप्रदेश यांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा घडल्यापासून संबंधित आरोपी फरार होते. सदर आरोपीत यांना पकडण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलेली होती. सदरचे पथक आज रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकातील अंमलदार यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत त्यांना अटक करून पुढील तपासाकिरता संबंधित आरोपींना झाबुवा मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे साहेब, अप्पर पो अधीक्षक श्री महामुनी साहेब तसेच उप विभागीय पो अधी श्री माईणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विवेक पाटील व पो उ नि सागर शिंदे, सपोफौ/708 दीपक साळवी , पोहवा/754 भालचंद्र मयेकर, पोकॉ /78 निलेश शिंगावे यांनी केलेली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg