loader
Breaking News
Breaking News
Foto

मिलाग्रीस ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश, शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

सावंतवाडी (प्रतिनिधी): ​बारावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला असून, येथील मिलाग्रीस ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान व वाणिज्य शाखेत घवघवीत यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. ​विज्ञान शाखेतून एकूण ४१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते आणि सर्व ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेत कुमारी आमना नसीर गवंडी हिने ७५.५० टक्के गुणांसह प्रथम, कुमार एरिक नेल्सन फर्नांडिस याने ६९.८३ टक्के गुणांसह द्वितीय, तर कुमार लाजरस गॉडविन मुनीस याने ६९.६७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच वाणिज्य शाखेतून एकूण ९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्व ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेत कुमार मोहम्मद अफाग नियाज नाईक याने ९१.३३ टक्के गुणांसह प्रथम, कुमार रॉक्सन डॉमनिक डिसोजा याने ७९ टक्के गुणांसह द्वितीय, तर कुमारी एंजल जॅक्सन फर्नांडिस हिने ७१.६७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. ​कॉलेजच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg